न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ नोव्हेंबर २०२३) :- पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने मावळ तालुक्यातील कुसावली, वानगाव, नागवली, डाहुली येथील कातकरी, आदिवासी बांधवासाठी दिवाळी फराळ, मिठाई तसेच भाऊबीज निमित्त महिलांसाठी साडीचोळीचे वाटप करण्यात आले. यावेळी येथील चिमुकल्यांच्या, महिलांच्या चेहऱ्यावरील आनंदाचे भाव, दिवाळीचा आनंद द्विगुणीत करून गेले.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर्षी आदिवासी बांधवांसह समाजातील तळागाळातील नागरिकांसोबत दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले होते. त्याला शहर भाजपच्या वतीने प्रतिसाद देत आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली.
यावेळी कुसावलीच्या सरपंच चंद्रभागा चिमटे, माजी सरपंच कैलास खांडभोर, ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ भालेराव, डाहुली ग्रामपंचायतचे उपसरपंच बळीराम वाडेकर, टाकवे ग्रामपंचायतचे उपसरपंच स्वामी जगताप, माजी नगरसेवक जयवंत बागल, मनोज ढोरे, योगेश चोपडे, सागर फुगे, प्रमोद ठाकर, अजय दुधभाते, बाळासाहेब आसवले, संजय मराठे, सुनील कोकाटे, संदीप दरेकर, अनिकेत पाडाळे, उमेश झरेकर, युवराज कदम, शुभम गायकवाड, मिलिंद कंक, जीवन जाधव, सुशांत जाधव, संतोष मांदळे, उल्हास असवले, अमित शिंदे, प्रसाद नवले, कुसावलीचे पोलीस पाटील मंगेश चिमटे यांच्यासह गावातील तंटामुक्ती कार्यकर्ते, पोलीस पाटील, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.