- पिंपळे सौदागर येथील जनसंपर्क कार्यालयात सफाई कामगारांना मिठाईचे वाटप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ नोव्हेंबर २०२३) :- पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ रहावे तसेच नागरिकांच्या आरोग्याला कुठलाही धोका निर्माण होऊ नये, म्हणून महापालिकेचे सफाई कर्मचारी निष्ठेने काम करीत असतात. रस्ते व परिसर स्वच्छ करण्याचे काम करीत असतात. अशा कर्मचाऱ्यांची दिवाळी देखील गोड व्हावी यासाठी उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने पिंपळे सौदागर येथील जनसंपर्क कार्यालयात सफाई कामगारांना मिठाईचे वाटप करून त्यांचीही दिवाळी गोड करण्यात आली. यावेळी सफाई कर्मचारी अत्यंत भावूक झाले होते.
यावेळी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कुंदाताई संजय भिसे, उद्योजक संजयशेठ भिसे, राजू शेलार, रमेश वाणी, सखाराम ढाकणे, मधुकर पाटिल, शिरीष जयस्वाल, उन्नती विठाई वाचनालयाचे पदाधिकारी, सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सफाई कामगारांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
डॉ. कुंदाताई भिसे म्हणाल्या, खऱ्या अर्थाने पिंपळे सौदागरला स्मार्ट करण्यासाठी पालिकेचे सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. नागरिकांनी सफाई कर्मचाऱ्यांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. दिवाळीच्या दिवशी सर्वजण पहाटे लवकर उठून आनंदोत्सव साजरा करतात, परंतु शहरांमध्ये सफाई करणाऱ्या कामगारांना मात्र, सकाळी उठून साफसफाई करावी लागते. घंटा गाड्यांमधून कचराही जमा करावा लागतो. आपण सणांचा आनंद घेत असताना जे नेहमी काम करत असतात त्यांनाही आनंदात सामावून घेण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर बिरारी यांनी केले.