न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ नोव्हेंबर २०२३) :- बिल्डींगच्या कामकाजाचा दर्जा सुधारुन देण्यासाठी व सुरक्षा देवुन बिल्डींगचे कामकाज पूर्ण करून देण्यासाठी वारंवार बिल्डरबरोबर फिर्यादी यांनी साधारण २० ते २५ मिटींग केल्या आहेत. त्यानंतर बिल्डरने सदनिकाचे संपूर्ण पैसे घेतले. राहण्यासाठी सदनीका उपलब्ध करून दिल्या. पण त्याबाबतचे कोणतेही कागदपत्रे ऊपलब्ध करून न देता, सदर ईमारतीचे सुखसुविधांचे, लाईट मिटरचे, प्रवेसद्वाराचे व सुरक्षारक्षकाचे, कायदेशीर ताब्याबाबतचे कागदपत्रांचे कामकाज पूर्ण न करता फिर्यादीसह सोसायटीचे सभासद व त्यांच्या परीवारामधील लोकांच्या जिवितास धोका निर्माण करून सदनिकांचे पुर्ण पैसे घेतले. आरोपी क्र १ ते १० व इतर यांनी फिर्यादी व साक्षीदार यांच्याकडुन विश्वासाने पुर्ण पैसे घेवुन त्यांची आर्थिक फसवणुक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार नोव्हेंबर २०१५ पासुन ते आजपर्यंत, साईनगर, मामुर्डी, देहुरोड येथील गृहनिर्माण सोसायटीत घडला आहे. फिर्यादी राजु आकाराम पाटील यांनी आरोपी १) बाळासाहेब जयवंत तरस, २) पराग प्रमोद कुलकर्णी, ३) विक्रम राठोड, ४) प्रकाश बळवंत राऊत, ५) नवनाथ पांडुरंग राऊत, ६) विकास भिमराव पाटील, ७) महिला आरोपी, ८) महिला आरोपी, ९) प्रवीन बलवंत राऊत, १०) नितीन पांडुरंग राऊत, व ईतर यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
देहुरोड पोलिसांनी सर्वांच्या विरोधात ६३९/२०२३ भा.द.वी. कलम ४०६,४२०,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सपोनि जाधव पुढील तपास करीत आहेत.