न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ नोव्हेंबर २०२३) :- बस पार्कीगमधून मागे घेत असताना फिर्यादीच्या वडीलांच्या डाव्या पायावर गाडी घालून त्यांना गंभीर जखमी केले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. आरोपीने वाहतुकीच्या नियंमाचे उल्लंघन करुन, हयगयीने गाडीच्या मागील बाजूस कोणी आहे का नाही? याबाबत काहीएक खातरजमा केली नाही. आरोपी हा त्यांच्या मरणास कारणीभुत झाला आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा अपघात (दि.२९/०८/२०२३ ते दि. ३०/०८/२०२३) लांडगेवस्ती, हिंदराज कॉलनी, भोसरी येथे घडला. फिर्यादी विकास शामसुंदर गौतम यांनी आरोपी बसवरील चालक विश्वकर्मा भागवत पांचाळ यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
भोसरी पोलिसांनी ९१५/२०२३, भा. द. वि. कलम ३०४ (अ), २७९ मो.वा.का. ११९/१७७,१८४ प्रमाणे आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि पवार पुढील तपास करीत आहेत.