न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे २०२४) :- व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत येणाऱ्या राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील (आयटीआय) विविध ट्रेडसाठी सोमवारी ३ जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठी संचालनालयाकडून आयटीआय मधील या प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक येत्या दोन दिवसांत जाहीर केले जाणार आहे.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत राज्यात एकूण ४१८ शासकीय आणि ५७४ खासगी संस्थांच्या माध्यमातून आयटीआय चालविले जातात. यामध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये १ लाख ४८ हजार ५६८ जागा उपलब्ध आहेत.
शासकीय आयटीआयमध्ये ८० हून अधिक ट्रेडसाठी ९२ हजार २६४ जागा, तर खासगी आयटीआयमध्ये ५६ हजार २०४ इतक्या प्रवेशासाठी जागा उपलब्ध आहेत.