- खुनाच्या गुन्ह्याची उकल; या कारणासाठी घेतला दीपकचा बळी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२४) :- सांगवीतील खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक करण्यात सांगवी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला यश आले आहे. दरम्यान (दि. २९) रोजी रात्री ०९.४५ वा. चे सुमारास न्यु सिध्देश्वर फॅमिली पान शॉप समोर, इंद्रप्रस्थ सोसायटी, माहेश्वरी चौक, नवी सांगवी येथे अमन गिल व त्याचे इतर साथीदारांनी मोटार सायकलवरुन येवुन बंदुकीतून दिपक दत्तात्रय कदम (रा. जुनी सांगवी) याच्यावर गोळ्या झाडुन त्याचा खुन केला होता. या घटनेबाबत सांगवी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुप्त बातमीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी अमन राजेंद्र गिल (वय १८ वर्षे, रा. नवी सांगवी) याला पोलिसांनी ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास केला होता. त्याचा दाखल गुन्ह्यामध्ये सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला (दि. ३०) रोजी गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्याच्याकडे तपास करुन गुन्ह्यातील पाहिजे आरोपी १) सुजल राजेंद्र गिल (वय १९ वर्षे, रा. नवी सांगवी), २) सौरभ गोकुळ घुटे (वय २२ वर्षे, रा. जुनी सांगवी) यांना यांना औध परिसरातुन ताब्यात घेतले. त्यांचा गुन्ह्यात सहभाग आढळल्याने (दि. ३१) रोजी त्यांना गुन्ह्यात अटक केली.
सुमारे २० दिवसापुर्वी मयत दिपक कदम याने आरोपी सुजल गील व अमन गील यास धमकावलेले होते. त्या पुर्व वैमनस्यातुन व सुडाच्या भावनेतुन आरोपींनी दिपक कदम याचा खुन केल्याचे तपासादरम्यान कबुल केले आहे. आरोपीकडे सखोल तपास करुन दाखल गुन्ह्यामध्ये आणखीन कोणाचा सहभाग आहे. याबाबत पोलीस तपास करत आहे. कोर्टाने आरोपी अमन राजेंद्र गिल (दि. ०४/०६/२०२४) रोजीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केलेली आहे. तसेच इतर दोन आरोपीस उद्या कोर्टात रिमांड कामी हजर केले जाणार आहे.