न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२४) :- पूर्वीच्या दारूच्या कॉटरचे पैसे न दिल्याचा राग मनात धरून फिर्यादीचा मोठा मुलगा संतोष याला पोटामध्ये हाताबुक्याने मारुन त्यास गंभीर जखमी केले. त्यावेळी फिर्यादीचा लहान मुलगा सुमीत याने आरोपींना अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फिर्यादी व लहान मुलालाही आर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन हाताने मारहान केली आहे.
ही घटना (दि २४/०५/२०२४) गणपती मंदीरा जवळ, विठ्ठलवाडी, देहूगाव येथे घडली. महिला फिर्यादि यांनी आरोपी (१) दिपक पांडुरंग चव्हाण (वय ३८ वर्षे), २) विक्रम उर्फ विकी पांडुरंग चव्हाण (वय ३४ वर्षे), ३) किरण पांडुरंग चव्हाण (वय ३७ वर्षे), ४) निखील पांडुरंग चव्हाण (वय ३२ वर्षे, चौघे रा. विठ्ठलवाडी, आळंदी रोड, मुख्य प्रवेशव्दाराशेजारी, देहूगांव), ५) उमेश उत्तम मांढरे (वय ३२ वर्षे, रा. गाथा मंदीर रोड, बायपास, अभंग इंग्लीश मिडीयम स्कुल शेजारी, देहूगांव) यांच्या विरोधात फिर्याद आली आहे.
देहुरोड पोलिसांनी २८९/२०२४ भा.द.वि. कलम ३२५,३२३,५०४,१४३,१४७,१४९ प्रमाणे सर्वांवर गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली आहे. पोउपनि राठोड पुढील तपास करीत आहेत.