- पालिकेच्या अग्निशमन विभागात चाललंय काय?…
- लघुउद्योजकांचा थेट कार्यालयावर धडक मोर्चा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जून २०२४) :- अग्निशमन विभागाकडुन चिखलीतील लघुउद्योजकांना नोटीसा देण्यात येत आहेत. उद्योजक त्याबाबत अग्निशामक विभागाच्या कार्यालयात गेल्यानंतर त्यांना एजंटला भेटा असे अधिकारी सांगत आहेत. उद्योजकांना व्यवस्थित वागणूक दिली जात नाही.
याची कुणकुण लागताच मा. स्वी. नगरसदस्य दिनेश यादव यांनी परिसरातील उद्योजकांना घेऊन महापालिकेच्या अग्निशमन विभागात ठिय्या मांडला. अग्निशमन विभागाचे अधिकारी चिपाडे यांना भेटून या अनागोंदी कारभाराबाबत जाब विचाराला.
त्यांनी उद्योजकांची बाजू एकूण घेतली. मुजोर कर्मचाऱ्यांना उद्योजकांसमोरच त्यांनी समज दिली. उद्योजकांना लागणारी सर्व मदत केली जाईल. अग्निशमन एनओसीसाठी लागणारी कागदपत्रांचीही त्यांनी सविस्तर माहिती दिली, असे दिनेश यादव यांनी सांगितले.