न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जून २०२४) :- प्रकल्पाच्या विकसकांशी फिर्यादीसह इतर ७१ फ्लॅटधारकांनी विश्वासाने फ्लॅट व इतर सोईसुविधा घेण्याकरिता ठरल्याप्रमाणे पुर्ण रक्कम देवुन व्यवहार केला होता. त्यांच्याशी झालेल्या व्यवहारात विकसकांनी सोसायटीच्या फ्लॅटधारकांना मालकीची असणारी पार्कीगची, अॅमिनिटीजची जागा व ओपन स्पेस (मोकळी जागा) सोसायटीला देणे तसेच कनव्हेन्स डीड करुन देणे बंधनकारक होते.
या प्रकल्पामध्ये त्यांनी एकुण तीन सोसायटया तयार करून प्रत्येक सोसायटीला एकाच ठिकाणची अॅमिनिटी स्पेस, मोळकी जागा नकाशामध्ये दर्शवुन त्या नकाशामध्ये इतर लोकांच्या मदतीने वेळोवेळी फेरबदल करून नकाशे मंजुर करून घेतले. या सोसायटीच्या सभासदांची कोणतीही परवानगी न घेता सर्व विकसक यांनी आपसात संगनमत करुन फिर्यादी यांच्या सोसायटीच्या मालकीच्या जागेवर वेंन्टेज टॉवर व बॅन्टेज हाय या नावाने दोन इमारती बांधुन वेंन्टेज टॉवर ही ११ मजल्यांची इमारत बांधुन त्यामध्ये ६६ कमर्शिअल ऑफिसेस व वॅन्टेज हाय या १० मजल्याच्या इमारतीमध्ये २७ सदनिका व १८ शॉप्स बांधुन सोसायटीतील एकुण ७२ सदनिका धारकांचा विश्वासघात करुन फसवणुक केलेली आहे, असं फिर्यादीत म्हंटल आहे.
हा प्रकार सन ०१/०१/२००७ ते अद्यापपावेतो नॅन्सी ब्रम्हा को ऑप सो लि. बावधन (खु), पुणे येथे घडला. फिर्यादी विशाल अरुण अडसुळ (वय ४२, बावधन) यांनी आरोपी १) विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल, २) राम कुमार अगरवाल, ३) विनोद कुमार अगरवाल, ४) नंदलाल किमतानी, ५) अशिष किमतानी व इतर आरोपी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हिंजवडी पोलिसांनी ७२५/२०२४ भादंवि कलम ४२०,४०९,३४ मो फा कायदा कलम ३,७,११,१३ प्रमाणे सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सोमनाथ पांचाळ, सहा. पोलीस निरीक्षक पुढील तपास करीत आहेत.