- भोसरीत एकाचा हकनाक बळी तर, थेरगावात अपघातामुळे एकाचे पाय जायबंदी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२४) :- पिंपरी चिंचवड शहरात ट्रॅव्हलवरील बस चालकांच्या हयगईमुळे अपघात वाढले आहेत. त्याला आळा घालणे गरजेचे आहे. दरम्यान मोशी आणि थेरगाव परिसरात लागोपाठ घडलेल्या अपघातांमुळे एका निष्पाप जीवास प्राणास मुकावे लागले आहे तर, एकाच्या दोन्ही पायांना गंभीर इजा पोहोचली आहे. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात बसचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या घटनेत नाष्टा करत असतांना ट्रॅव्हलवरील चालकाने फिर्यादीच्या मुलाला धडक दिली. त्यामुळे तो जमीनीवर खाली पडला. बसचे चाक त्याच्या अंगावरुन गेल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. आरोपी चालक त्याच्या मृत्युस कारणीभुत झाला आहे, असं फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार (दि. १५) रोजी रात्री ८.३० च्या सुमारास गावजत्रा मैदान, ट्रॅव्हल (खाजगी बस) पार्कीगमध्ये, मोकळ्या जागेत, पुणे-नाशिक रोड, भोसरी येथे घडला. फिर्यादी हुसेनखॉ मेहताबखा पठाण (वय ४२ वर्ष, काळेवाडी) यांनी आरोपी ट्रॅव्हल (खाजगी बस) नंबर एम.एच.१२ एफ. झेड ८०९५ वरील चालक शुभम संजय सुरवसे (वय २५ वर्ष रा. हडपसर) याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. भोसरी पोलिसांनी ३८५/२०२४ भा.द.वि.कलम ३०४ (अ) नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपी चालकाला अटक करण्यात आली आहे. पोउपनि गुरव पुढील तपास करत आहेत.
दुसऱ्या घटनेत रस्ता पायी क्रॉस करीत असताना ट्रॅव्हल्स बस वरील चालकाने वाहतुकीच्या नियमाचे पालन न करता, भरधाव वेगाने, हयगयीने बस चालवुन रस्ता क्रॉस करणाऱ्या पादचारी इसमास धडक दिली. दोन्ही पायावरून बसचे पुढील उजवे चाक गेल्याने निलेश ग्यानशीन इनवाती (वय-३२ वर्षे) यांच्या दोन्ही पायांना गंभीर जखम झाली आहे. आरोपी चालक त्यास कारणीभुत झालेला आहे. ही घटना (दि. १६) रोजी ०७.०० च्या सुमारास डांगे चौकातील रस्त्यावर थेरगांव येथे घडली. अनिल जगन तेली (वय-४७ वर्षे रा. भुसावळ, जिल्हा जळगांव) याच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात ७२७/२०२४ भा.दं.वि कलम २७९,३३८ मोटार वाहन कायदा कलम १८४, ११९/११७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि जाधव पुढील तपास करीत आहेत.