- बंडगार्डन वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे यांच प्रतिपादन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जून २०२४) :- “गेल्या १० वर्षाचा वाढत्या शहरीकरणाचा आलेख पाहिला असता पुणे शहरातील वाहतूक १० पट वाढली आहे. त्या प्रमाणात वाहतुक पोलिसांकडे उपलब्ध असलेले मनुष्यबळ कमी पडते. त्याबरोबरच ‘मेट्रो’ सारख्या सार्वजनिक वाहतुकीकरता आवश्यक असलेल्या विकास प्रकल्पांमुळे शहराच्या वाहतुकीवरसुद्धा परिणाम होत आहे. त्याकरिता वाहतूक नियोजन सुक्ष्म अभ्यास करून पार पाडावे लागते.
वाहनांची वाढती संख्यासुद्धा शहराच्या वाहतुकीवर अतिरिक्त ताण निर्माण करत आहे. अश्या परस्थितीत पुणे शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाकरिता प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या वाहतूक पोलीस मित्रांची रस्त्यावर मिळणारी मदत खूप मोलाची ठरत आहे. संस्थेची २३ वर्षांपासून पोलीस प्रशासनाला मिळणारी मदत नक्कीच वाखागण्याजोगी आहे.” असे मत पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे यांनी बंडगार्डन वाहतूक विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या पोलीस मित्रांच्या सन्मान सोहळा कार्यक्रमात व्यक्त केले.
प्रमुख उपस्थिती सहा. पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंभार, प्राधिकरण सुरक्षा समितीच्या राज्य कार्याध्यक्ष कविता बेंडाळे, समिती राज्य अध्यक्ष डॉ. विजयकुमार पाटील, कार्यकारणी सदस्य विशाल शेवाळे, संतोष चव्हाण, राम सुर्वे, पुणे शहर विभागप्रमुख संदीप नाना कुंबरे, सांगवी विभाग प्रमुख राजेंद्र कुंवर यांची होती.
या प्रसंगी सहा.पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंभार म्हणाले,” सांगवी, बाणेरमध्ये पार पडलेल्या महामॅरेथॉन स्पर्धांमध्ये, तसेच अमिटी बिजनेस स्कूल च्या मॅरेथॉन स्पर्धेच्या वेळी रस्त्यावरील वाहतूक नियोजनात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पोलीस मित्रांचे प्रमुख चौकांमधील सुरक्षाहेतु केलेल्या कामामुळे वाहतूक पोलिसांना मोलाची मदत झाली. त्यामुळे आज ह्या पोलिस मित्रांचा सन्मान करताना आनंद होत आहे. यापुढेही येणाऱ्या पालखी सोहळ्यात पोलीस प्रशासनास सर्व स्वयंसेवकांची अशीच मदत मिळेल यात शंका नाही.”
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या राज्य कार्याध्यक्ष कविता बेंडाळे म्हणाल्या,” आमची संस्था गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस प्रशासनास बंदोबस्त असो किंवा वाहतूक नियोजन वेळोवेळी आवश्यकतेनुसार सहकार्य करीत आलेली आहे. अशामुळे नागरिक व पोलीस प्रशासन एकत्रित रित्या सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य करत असते. येत्या पालखी सोहळ्यास आमची समिती वारकरी सेवा हेतू मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे.”
या वेळी पुणे शहर वाहतूक पोलीस प्रशासनास सहकार्य करणाऱ्या २५ पोलीस मित्र, एसपीओ त्यामध्ये महिला राज्य प्रमुख अर्चना घाळी दाभोळकर, संदीप कुंबरे, सुनिल सुतार, संदीप जाधव, प्रवीण जोंधळे, प्रदीप पिलाणे, अनिल मेंगडे, नितीन ढमणगे, सतीश देशमुख, निखिल कुमावत, विठ्ठल पाटील, शशिकांत जमदाडे, राजेंद्र कुंवर, सातप्पा पाटील, सीमा निकम, गौरी सरोदे, विशाल शेवाळे, रामेश्वर गोहिल, राम सुर्वे, संतोष चव्हाण, नितीन मांडवे, अजय घाडी, कलाप्पा डोंगरे, ज्ञानेश्वर तोंडे यांचा बंडगार्डन वाहतूक पोलीस विभागातर्फे सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे पोलीस कर्मचारी पो.हवालदार.अतुल केकाण, नितीन ढवळे,पो.शिपाई.गणेश साळवे, राजाभाऊ तांबडे, अच्युत सुतार यांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राधिकरण सुरक्षा समितीचे डॉ विजयकुमार पाटील यांनी तर, आभार प्रदर्शन सहा. निरीक्षक राजेंद्र कुंभार यांनी केले.