न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जून २०२४) :- आयसीआयसीआय होम फायनान्सने अप्पर जिल्हाअधिकारी यांच्या हुकुमावरुन फ्लॅट जप्त केला होता. नायब तहसिलदार यांनी हा फ्लॅट लॉक करुन सिल केला होता. दरवाजावर प्रापर्टी जप्त केल्याची नोटीस लावलेली होती.
दरम्यान असे असताना आयसीआयसीआय होम फायनान्सच्या ताब्यात असलेल्या या फ्लॅटमध्ये तिघांनी गृहअतिक्रमण केले, असं फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार (दि. १४) रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास पिंपळे निळख येथील निर्मिती क्लासिक, या स्किममधील विंग ए मधील पहील्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये हा प्रकार घडला.
फिर्यादी तपन विठठल कानडे यांनी आरोपी १) नवनाथ किशन शिंदे, २) महिला आरोपी, ३) महिला आरोपी यांच्या विरोधात फिर्याद नोंदवली आहे. सांगवी पोलिसांनी २६७/२०२४ भा.दं.वि कलम ४४८,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि शिखरे तपास करीत आहेत.