न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०२४) :- इमारतीसमोरील ‘पोर्च’चे बांधकाम सुरु होते. पोर्चवर स्लॅप टाकण्यात येत होता. दरम्यान स्लॅपच्या खालील बाजुस लावलेल्या सपोर्टची काळजी न घेता निष्काळजीपणा केला. त्यामुळे स्लॅप कोसळुन अपघात होऊन ९ कामगार गंभीर जखमी आहेत.
ही घटना (दि. १८) रोजी रात्री ०७.३० वा. चे सुमारास अजिंक्य डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग कॅम्पस, चऱ्होली बु, येथे हॉस्पीटल इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी घडली.
याप्रकरणी आरोपी १) कारपेंटरचे कॉन्ट्रॅक्ट घेणारे मोहंमद अबरार आलम, २) काँक्रेटचे कॉन्ट्रॅक्ट घेणारे मोहंमद राशीत रजा यांच्या विरोधात दिघी पोलीस ठाण्यात २७७/२०२४ भा.द.वि. कलम ३३७,३३८, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि रणवरे पुढील तपास करीत आहेत.