न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०२४) :- अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन आरोपी पतीने १९ वर्षीय पत्नीला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हाताने जीव जाईपर्यंत गळा दाबुन व नाक-तोंड दाबन खुन केला आहे.
याप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मयत असा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाअंती हा प्रकार (दि. १६) रोजी ११:०० च्या सुमारास भाटे वस्ती, देहू-आळंदी रोड, तळवडे येथे उघडकीस आला.
विशाल कुमार जगत बहादुर (वय २० वर्षे रा. मुळगाव गाव प्रयागराज इलाहाबाद राज्य उत्तरप्रदेश) याच्या विरुद्ध देहुरोड पोलीस ठाण्यात ३२३/२०२४ भा.दं.वि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अटकेत आहे. पोउपनि वाघमारे तपास करीत आहेत.