न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०२४) :- गाडीवर बसण्यासाठी जागा दिली नाही या कारणावरून तिघांनी दमदाटी केली. अश्लील शिवीगाळ केली. त्याचा फिर्यादीने जाब विचारला. त्यावरून तिघांनी फिर्यादी तरुणाला हाताने मारहाण केली.
त्यानंतर फिर्यादीच्या घरासमोर येवुन ‘तुम्ही बाहेरून येवुन आमच्या गावात राहता व पैसे कमवता. येथे रहायचे असेल तर मला पैसे द्यावे लागतील. मला दारू पिण्यास २००० रू. दे नाहीतर तुला ठोकुन टाकील’ अशी दमदाटी केली. तसेच पहाटेच्या सुमारास इतर अनोळखी दोन आरोपीसह संगणमत करून कोयत्यासारखे हत्यार तसेच बंदकीसारखे शस्त्र घेऊन आरोपी फिर्यादीच्या घरासमोर आले.
दरम्यान आरोपी क्र १ याने जोरजोराने ओरडुन ‘घराचे बाहेर ये दुसरं कोणी आलं तर त्याला सुध्दा ठोकतो’ असं म्हणत त्यांनी हातातील बंदुकीसारख्या शस्त्रातुन दोन वेळा हवेत गोळ्या झाडल्या. त्यामुळे तेथे बाहेर आलेले लोक घाबरून सैरावैरा पळाले व त्या लोकांनी घाबरून आपापले घराचे दरवाजे बंद केले, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. १९) रोजी सायं ६:३० ते दि. २० रोजी ०६.०० च्या) दरम्यान मोहितेवाडी, चाकण येथे घडला. फिर्यादी संजय तानाजी वाघमारे (वय ४० वर्षे, व्यवसाय मजुरी, पोतलेमळा, शेलपिंपळगाव) यांनी आरोपी १) सचिन मोहिते व २) दोन अनोळखी इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चाकण पोलिसांनी ४४२/२०२४ भा.दं.वि कलम ३८७, ३४१, ४४८, २९४, ३२३, ५०४, ५०६, ३४, भा.ह.का.क.४ (२५), फौ.सु.का.क.३,७ म.पो.अ.३७(१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपी क्र १ याला अटक केली आहे. पोउपनि बोरकर पुढील तपास करीत आहेत.