न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०२४) :- कंपनीत असिस्टंट मॅनेजर अकाऊटंट पदावर काम करणाऱ्याकडे कंपनीस माल पुरविणाऱ्या व्हेंडर कंपनी व फर्म यांना कामाच्या स्वरुपानुसार देणी असणारी रक्कम अदा करण्याची जबाबदारी विश्वासाने सोपविण्यात आली होती.
दरम्यान आरोपीने कंपनीच्या वेगवेगळया व्हेंडर कंपनी/फर्म यांना १,४०,००,००० रक्कम अदा केल्याचे दर्शवुन ती रक्कम स्वतःच्या आर्थिक फायदयाकरीता कंपनीचा विश्वासघात करुन स्वतःच्या बँक खात्यावर पाठवुन १,४०,००,००० रुपयांचा अपहार करून कंपनीची आर्थिक फसवणूक केली आहे.
हा प्रकार (दि. ०१/०४/२०२१ ते दि. २८/०४/२०२४) या कालावधीत पतोडीया फोर्जीग अॅन्ड गिअर्स लि. कंपनी, महाळुंगे इंगळे, ता खेड जि पुणे येथे घडला. फिर्यादी सुर्यकांत दशरथ वाघमारे (वय ५० वर्ष) यांनी आरोपी असिस्टंट मॅनेजर अकाऊटंट महादेव राम जाधव (वय ४० वर्ष, रा. रणजित मंगल कार्यालयजवळ, कडाचीवाडी, ता खेड जि पुणे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी ३९१/२०२४ भा.दं.वि कलम ४०८,४२० प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि शिंदे पुढील तपास करीत आहेत.