न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जून २०२४) :- भोसरी विधानसभा मतदार संघातील समाविष्ट गावे आणि सोसायटीधारकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी आम्ही सातत्यपूर्ण काम करीत आहोत. सर्वसामान्य नागरिकांना पायाभूत सोयी-सुविधा सक्षमपणे पुरवण्यासाठी कटिबद्ध आहोत, अशी भूमिका भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली.
आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने चिखली येथील ताम्हाणे वस्ती येथे श्रीदत्त मंदिर सभामंडपाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच, शिवछत्रपती हाउसिंग सोसायटी येथील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजनही केले आहे.
यावेळी माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, जितेंद्र यादव, किसन बावकर, माजी क्रीडा समिती सभापती कुंदन गायकवाड, पांडुरंग साने, विनायक मोरे, निलेश भालेकर, संजय ताम्हाणे, सुदाम ताम्हाणे, राजू म्हेत्रे, सुहास ताम्हाणे, अजय साने, अविनाश मोरे, हरिभाऊ ताम्हाणे, दत्ता ताम्हाणे, चंद्रकांत ताम्हाणे, केदार हुर्दळे, सुदाम कुदळे, पोपट भागवत, प्रकाश तिरखुंडे यांच्यासह परिसरातील भाविक, रहिवाशी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
दिघी येथे आनंदाश्रय- गोल्ड क्लिप सोसायटी, परांडेनगर येथील स्थानिक रहिवाशी व नागरिकांच्या मागणीनुसार रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच, बी. यु. भंडारी सोसायटी प्लॉट नंबर ६२ आणि ६३ या परिसरातील रस्ता काँक्रिटीकरण कामालाही आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये सुरूवात करण्यात आली. यावेळी माजी उपमहापौर हिरानानी घुले, सामाजिक कार्यकर्ते संजय गायकवाड, माजी नगरसेवक विकास डोळस, माजी नगरसेविका निर्मला गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते कुलदीप परांडे, उदय गायकवाड, प्रमोद पठारे, नवनाथ मुऱ्हे, मनोज गायकवाड, विनोद डोळस यांच्यासह सोसायटी कमिटीचे पदाधिकारी व रहिवाशी उपस्थित होते.
गेल्या १० वर्षांमध्ये दिघी गावची ‘कनेक्टिव्हीटी’ वाढवण्यासाठी मुख्य रस्ते आणि पर्यायी रस्त्यांचा प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तसेच, महायुती सरकारच्या माध्यमातून समाविष्ट गावांच्या विकासाला प्राधान्य दिले असून, पायाभूत सोयी-सुविधांसह सोसायटीधारकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सोसायटीधारक, नागरिकांनी नागरी समस्या मार्गी लावण्यासाठी परिवर्तन हेल्पलाईन : 93 79 90 90 90 वर संपर्क करावा, असे आवाहन करतो.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.