न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जून २०२४) :- दारू विक्रीचा कोणताही वैध परवाना नसताना हॉटेलचा मालक, हॉटेल मॅनेजर यांनी विहीत वेळेपेक्षा अधिक वेळ हॉटेलमध्ये खाद्यपदार्थ व दारू विक्री चालू ठेवली.
त्या ठिकणी प्रतिबंधीत तंबाखुजन्य हुक्का पिण्यास देवुन विक्री केली. विहीत वेळेपेक्षा जास्त वेळ म्यूझीक चालू ठेवल्यामुळे ग्राहक डान्स करत होते. त्यावेळी पोलीस कारवाई करण्याकरीता गेले असता आरोपींनी पोलीसांना दमदाटी केली आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. २२) रोजी पहाटे २:५५ वा. फवेला गॅस्टो स्काय बार, सुरवाला कॉप्लेक्स, हिंजवडी येथे घडला.
१) सुमित चौधरी (वय-३० वर्ष, रा विमाननगर), २) प्रफुल गोरे, ३) राघव यशपाल सिंग व इतर आरोपी यांच्या विरोधात हिंजवडी पोलिसांनी ७७९/२०२४ भा.द.वि. कलम १८६,२८५,३३६,३४ महाराष्ट्र प्रोहीबिशन अॅक्ट कलम ६५ (ई),६८ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३३ (एन) (डब्लू) सह १३१ सह सिंगारेट व ईतर तंबाखू उत्पादने (जाहिरात प्रति. व व्यपार वाणिज्य, वितरण व पुरवठा विनियमन) अधिनियम २००३ चे कलम ४,७,२१ व सुधारणाअधिनियम सन २०१८ चे ४ (अ), २१ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पोउपनि पांचाळ तपास करीत आहेत.