- दापोडी ,फुगेवाडी कासारवाडी परिसरातील १०वी व १२वी तील २२४ गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान..
- कलारंग संस्था व अमित गोरखे युथ फाऊंडेशनचा उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जून २०२४) :- “पिं. चिं. मधील एक साधा काकडी विक्रेता ते नॉवेल ग्रुप ऑफ़ इन्स्टिट्यूटचा संस्थापक अध्यक्ष हा प्रवास खडतर होता. माझ्या मनातील शिक्षणाची प्रबळ इच्छा व ध्येय निश्चित केल्यानेच यशाच्या शिखरा पर्यंत पोहचू शकलो. आपल्या यशस्वी होण्यात शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी आणि आई – वडिलांनी आपल्या मुलांसाठी प्रचंड परिश्रम घेतलेले असतात. हे विद्यार्थ्यांनी नक्किच लक्षात घावे. स्पर्धेचे जग असल्याने शिक्षणाच्या स्पर्धेत मुलांनी एकमेकांविषयी द्वेष न ठेवता स्पर्धा करावी. कोणाला कमी लेखू नये.” असे मत नॉवेल ग्रुप ऑफ़ इन्स्टिट्यूटचा संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे यांनी व्यक्त केले.
सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात १०वी/१२वीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी भागातील २२४ विद्यार्थ्यांचा कलारंग संस्था व अमित गोरखे युथ फाऊंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. दापोडी मधील अग्रेसन भवन येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अमित गोरखे बोलत होते.
यावेळी निगडी प्राधिकरणचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, पिं. चिं. भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष व नगसेविका सुजाता ताई पालांडे, पिं.चिं. मनपा नगरसेवक प्रशांत फुगे, पिं.चिं. मनपा स्विकृत नगरसेवक संजय कणसे, पिं.चिं. मनपा नगसेविका अनुराधा गोरखे, पिं.चिं. भाजपा उपाध्यक्ष विशाल वाळुंजकर, पिं.चिं. मनपा आरोग्य निरिक्षक प्रकाश(तात्या)जवळकर, पिं.चिं. भाजपा चिटणीस देवदत्त लांडे, भाजपा पदाधिकारी नंदू भोगले, प्राध्यापक संजय शेडगे, भाजपा कार्यकर्ते सुरेश गदिया, प्रतिभा जवळकर,मीनाक्षी गायकवाड,जयश्री नवगिरे, पिं.चिं. भाजपा अनुसुचित जाती मोर्चाचे सरचिटणीस धर्मेंद्र क्षीरसागर, आप्पा साहेब धावडे, रामदास भांडे तसेच आमित गोरखे युथ फाऊंडेशनचे सर्व युवा कार्यकर्ते, विद्यार्थी, पालक आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थिती होते. कार्यक्रमाला या सर्वांचे सहकार्य लाभले.
यावेळी बोलताना सदाशिव खाडे म्हणाले, “अमित गोरखे युथ फाऊंडेशन नेहमीच समाजात शैक्षणिक क्षेत्रात सहयोग देत आले आहे. या शहरात शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून नॉवेल ग्रुप ऑफ़ इन्स्टिट्यूटच्या रुपात शिक्षण संस्था कार्यरत आहे. आज त्या शिक्षण संस्थेच्या छोट्याश्या रोपाचा एक भव्य वटवृक्ष झालेला आपल्याला पहायला मिळत आहे.”
सुजाता पालांडे म्हणाल्या की, “समाजात शिक्षणाच्या माध्यमातून केलेली समाज सेवा या सारखी पवित्र सेवा असुच शकत नाही. या सेवेचे शिव धनुष्य अमित गोरखे युथ फाऊंडेशने उचलेले आहे याचा आम्हाला सार्थ आभिमान आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय मोरे यांंनी केले तर आभार प्रकाश तात्या जवळकर यांनी मानले.