- वॅगनोर, स्विप्ट, अल्टो, टाटा इंडिगो, रिक्षा, टेम्पो या वाहनांची केली तोडफोड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०२४) :- पाच जणांच्या टोळक्याने पार्क केलेल्या चारचाकी गाडीवर वीट मारली. त्याचा जाब विचारताच “तु आम्हाला ओळखत नाही का, आम्ही इथले भाई आहोत” असे म्हणुन तरुणाला धमकावत हातातील कोयत्याचा धाक दाखवत १२००/- रुपये खिश्यातुन जबरदस्तीने काढुन घेतले. हाताने मारहाण केली. याला लई चरबी आली आहे का, याची गाडी फोडा असे म्हणुन तेथेच पडलेल्या वीटेनी तरुणाच्या गाडीच्या पाठीमागील काचेवर मारुन काच फोडली.
जमावाला हातातील लोखंडी कोयते व लोखंडी रॉड हवेत फिरवुन ‘तुम्ही येथुन निघुन जा, नाहीतर तुम्हाला एकेकाला संपवुन टाकु’ असे धमकावुन दहशत निर्माण केली. तेथे जमा झालेले लोक घाबरुन निघुन गेले. तसेच दुकानदारांनी घाबरुन त्यांची दुकाने बंद केली. त्यानंतर ते सर्व जण आरडाओरडा करत तेथे पार्क केलेल्या वॅगनोर, स्विप्ट, अल्टो, टाटा इंडिगो, रिक्षा, टेम्पो यांच्या काचावर लोखंडी कोयत्यांनी व लोखंडी रॉडने मारुन त्यांच्या काचा फोडुन नुकसान करुन तेथुन पळुन गेले. हा प्रकार (दि. १७) रोजी रात्री १०.४५ वा चे सुमा. राधाकृष्ण कॉलनीतील रोडवर, नढेनगर, काळेवाडी येथे घडला.
फिर्यादी रावसाहेब गोविंद माने यांनी आरोपी १) रोहित बबलु सिंग वय अंदाजे २२ वर्षे रा. काळेवाडी, पुणे. व त्याचे अनोळखी चार साथीदार, २) चेतन मंगेश गायकवाड वय १९ वर्षे रा. साई हौसिंग सोसायटी, बिल्डींग नं. ११, फ्लॅट नं. २०१, आण्णासाहेब मगर स्टेडियम जवळ, विठ्ठलनगर, नेहरुनगर, पिंपरी, ३) रोहित राजेश मिश्रा वय २२ वर्षे रा. कापसे हॉस्पीटल समोरील चाळीत, भवानी मार्केट जवळ, नेहरुनगर पिंपरी, ४) विधीसंघर्षीत बालक, ५) विधीसंघर्षीत बालक यांच्या विरोधात फिर्याद नोंदवली.
वाकड पोलिसांनी ८१५/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३१० (२), ३५१ (२)/ (३), सह शस्त्र अधि. कलम ४ (२५), ३५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३), १३५ सह क्रिमीनल लॉ अॅमेडमेन्ट अॅक्ट कलम ३ व ७ नुसार गुन्हा दाखल करीत विधीसंघर्षीत बालक क्र. ४ व ५ यांना समजपत्र देवुन त्यांच्या नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आलेले आहे. आरोपी क्र. १ ते ३ अटक आहेत. पोउपनि पोटे पुढील तपास करीत आहेत.