- चिखलीतील नागरिकांकडून पोलीसांच्या कारवाईबाबत समाधान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०२४) :- चिखलीत गरीब, कष्टकरी, नोकरदार, व्यापारी समाजातील विविध वर्गांचा समावेश आहे. एकंदरीत संमीश्र लोकवस्ती आहे. अशी लोकवस्ती असलेल्या परिसरात पो.स्टे. रेकॉर्डवरील गुन्हेगार अस्लम बशीर मुजावर, वय २९ वर्षे, रा. साने कॉलनी, मोरेवस्ती, चिखली हा खुनशी आणि धाडसी घातक प्रवृतीचा गुन्हेगार राहण्यास आहे.
तो काहीएक कामधंदा करीत नाही. त्याच्या विरुध्द सन २०१३ पासुन ते सन २०२४ पर्यंत शरिराविरुध्द व मालाविरुध्दचे एकुण १२ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. नियोजित स्थानबध्द गुन्हेगार अस्लम बशीर मुजावर, हा स्वतः तसेच साथीदारांसह जवळ तलवार, लाकडी दांडके, हॉकी स्टिक, यासारखे घातक शस्त्रे बाळगून रात्री- अपरात्री मोरेवस्ती, चिखली, कुदळवाडी, निगडी, परीसरात व लगतचे पोलीस स्टेशन हद्दीत सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करुन गर्दी मारामारी, गंभीर दुखापत करणे, खंडणी मागणे, मालमत्तेचे नुकसान करणे असे भारतीय दंड संहितेचे प्रकरण १६ किंवा १७ व शस्त्र अधिनियम १९५९ च्या प्रकरण ५ नुसार शिक्षापात्र अपराध वारंवार करीत आहे.
तसेच त्याने आपल्या साथीदारांसह परीसरात इतकी दहशत निर्माण केली आहे की, तो मारामारी, खंडणी, बलादग्रहण, जबरी चोरी, हत्यार बाळगणे, दमदाटी करुन तो आपले साथीदारांचे मदतीने हिंसाचारी, विघातक गुन्हेगारी कृत्ये करीत असतो. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे गोरगरीब, सामान्य लोकांच्या जिवीतास व मालमत्तेस धोका निर्माण झालेला आहे. त्याचे गुन्हेगारी कृत्यामुळे सर्वसामान्य जनतेस जीवन जगणे मुश्किल झाले आहे. त्याचे गुन्हेगारी कृत्यामुळे सदर भागातील जनजीवन विस्कळीत झाले असुन परीसरातील सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात आली असल्याचे निदर्शनास आल्याने त्याची दहशत व गुन्हेगारी वृत्तीला चाफ लावण्याबाबत पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्या आदेशान्वये चिखली पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी ठरवले.
त्याप्रमाणे त्यांनी पोलीस उपनिरीक्षक राजेश मासाळ व सर्व्हेलन्स टीम यांना मार्गदर्शन करुन अत्यंत प्रभावीपणे एमपीडीए प्रस्ताव तयार केला. तो पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांना सादर केला. पोलीस आयुक्त यांनी प्रस्तावाची गंभीरपणे दखल घेत रेकॉर्डवरील गुन्हेगार अस्लम बशीर मुजावर यास स्थानबध्द करण्याचे आदेश पारीत केलेले आहेत. त्यामुळे चिखली परिसरातील नागरिकांनी पोलीसांच्या या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले आहे.