- वाकड, चिंचवड विभागाचे सहायक आयुक्त बदलले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०२४) :- पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील सहायक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये वाकड, चिंचवड विभागाचे सहायक आयुक्त बदलले आहेत. तर गुन्हे शाखा व वाहतूक शाखेच्या सहायक आयुक्त पदावर नेमणूक करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी काढले आहेत.
गुन्हे शाखेच्या सहायक आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार वाकडचे सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्याकडे होता. दरम्यान, गुरुवारी झालेल्या बदल्यांमध्ये डॉ. विशाल हिरे यांची वाकड विभागातून गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे.
तसेच सहायक आयुक्त मुगुटलाल पाटील यांची अभियान येथून बदली झाली असून, त्यांच्याकडे चिंचवड विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. चिंचवड विभागाचे सहायक आयुक्त राजू मोरे यांची वाहतूक विभागाच्या सहायक आयुक्तपदी बदली झाली आहे. तसेच ठाणे शहर येथून पाच जुलै २०२४ रोजी पिंपरी-चिंचवड येथे हजर झालेले सहायक आयुक्त सुनील कुराडे यांच्याकडे वाकड विभागाची जबाबदारी दिली आहे.