- समितीवर भाजपचे वर्चस्व..
- भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या या नगरसेवकांना मिळाली संधी..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २० फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेची तहकूब विशेष सभा आज शुक्रवारी पार पडली. या सभेत स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली. गटनेत्यांनी आपापल्या पक्षातील नगरसेवकांची नावे बंद लिफाफ्यातून महापौरांकडे सादर केली.
स्थायी समितीत भाजपचे वर्चस्व कायम राहिले असून पक्षाकडून अभिषेक बारणे, शालिनी गुजर, मनीषा चिंचवडे, संदीप कस्पटे, सारिका गायकवाड, योगिता नागरगोजे, कृष्णा सुरकुले, अर्चना करांडे, मधुरा शिंदे, बाबा त्रिभुवन आणि शितल वर्णेकर यांची निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सविता आसवानी, संतोष कोकणे, संदीप वाघेरे आणि विकास साने यांना स्थायी समितीवर संधी देण्यात आली आहे. तर शिवसेनेकडून सुलभा उबाळे यांची निवड जाहीर करण्यात आली.
सभेत कोणताही वाद न होता प्रक्रिया पार पडली. स्थायी समिती ही महापालिकेतील महत्त्वाची निर्णयप्रक्रिया करणारी समिती मानली जाते. त्यामुळे या निवडींनंतर महापालिकेतील पुढील राजकीय व प्रशासकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.












