- प्रभारी आयुक्त श्रावण हर्डीकर कार्यमुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ११ मार्च २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी कोकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आदेश जारी केला आहे. यासंदर्भातील आदेश सह सचिव सुभाष उसरणीकर यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आला आहे.
सदर आदेशानुसार पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.
शासनाच्या निर्देशानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार सोपवून नवीन पदाचा कार्यभार तातडीने स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या आदेशाची प्रत संबंधित विभागांना पाठविण्यात आली असून बदलीनंतर प्रशासनिक कामकाज सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, पुर्णवेळ आयुक्तांच्या नियुक्तीमुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पुढील कामकाजाला वेग येण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.












