- भारतीय जनता माथाडी संघटनेकडून अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २३ मार्च २०२६) :- माथाडी कामगारांचे भाग्यविधाते व मराठा क्रांतिसूर्य स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियनच्या वतीने टेल्को रोड येथील केएसबी चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी संस्थापक अनुप अविनाश मोरे, प्रमोद अर्जुन झोळ (कामगार प्रतिनिधी – पिंपरी चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ), गौरव गोळे, अमोल सोनवणे, विशाल झोळ, भूषण शेलार, रोहित गायकवाड, सुरज पाटील, विठ्ठल इंगळे आदी उपस्थित होते.
या प्रसंगी अण्णासाहेब पाटील यांच्या कार्याची आठवण करून त्यांच्या योगदानाला उजाळा देण्यात आला. कामगारांच्या हक्कांसाठी त्यांनी दिलेल्या लढ्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. उपस्थितांनी त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचा संकल्प व्यक्त केला.
संस्थापक अनुप अविनाश मोरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांना सन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून दिला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे संघटित आणि असंघटित कामगार चळवळीला बळ मिळाले. आजच्या पिढीने त्यांच्या विचारांचा वारसा जपणे गरजेचे आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही कामगारांच्या हितासाठी सातत्याने कार्यरत राहू.”














