न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- महापौर राहुल जाधव यांनी पुण्यातील घटनेच्या धर्तीवर शहरातील सर्व होर्डिंग्जचे धोरण तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत होर्डिंग्जला आवर घालण्याकरीता आकाशचिन्ह व परवाना विभागाने शहरातील अधिकृत होर्डींग्ज सोडून एकूण ३२५ अनधिकृत होर्डिंग धारकांना होर्डींग्स हटवण्याकरीता नोटीसा पाठविल्या आहेत.
शहरात एकूण १८५० अधिकृत होर्डिंग्ज असून अद्यापपर्यंत पालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाच्यावतीने २२ अनधिकृत होर्डींग्स धारकांवरती फौजदारी कारवाई करण्यात आली आहे.











