न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- मा. नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र बुलढाणा जात प्रमाणपत्र समितीने रद्दबातलच्या आदेशाची पुनर्तपासणी करण्याचे निर्देश नागपूर खंडपीठाने जात पडताळणी समितीला दिले आहेत, अशी माहिती मा. नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी दिली.
आज गुरुवार रोजी महापालिकेत झालेल्या पत्रकार परिषदेस महापौर राहुल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार उपस्थित होते. फेब्रुवारी १७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत कुंदन अंबादास गायकवाड हे चिखली प्रभाग क्रमांक एक मधून भाजपच्या तिकीटावर विजयी झाले. त्यांनी कैकाडी जातीचा दाखला सादर करत अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडणूक लढविली होती.
त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना उमेदवार नितीन दगडू रोकडे यांनी कुंदन गायकवाड यांच्या जात दाखला आणि जात प्रमाणपत्र पडताळणीवर हरकत घेतली. गायकवाड यांचा जात दाखला अवैध असल्याचा निर्णय बुलढाणा जिल्हा विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने २९ सप्टेंबर रोजी दिला होता. त्यानुसार महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना गायकवाड यांचे नगरसेवक पद रद्द केले होते.
गायकवाड यांनी याबाबत नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती. त्यावर बुलडाणा जात पडताळणी समितीच्या निर्णयाला नागपूर खंडपीठाने स्थगिती देत जात प्रमाणपत्राची फेरतपासणी करण्याचे निर्देश दिल्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तोपर्यंत आपले नगरसेवक पद कायम राहिले पाहिजे. त्यामुळे आयुक्तांनी कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.










