न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरी येथील जीकेएन सिंटर मेटल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये कामगारांनी यंत्र पुजा करून विजयादशमी आनंदाने साजरी केली.
यावेळी महिंद्रा सिंटर्ड कामगार संघटना व जीकेएन सिंटर मेटल्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी व कामगारांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संबीत प्रहराज होते. कामगार संघटनेचे अध्यक्ष संभाजी शिंदे, उपाध्यक्ष प्रमोद मोरे, सचिन शितोळे, जनरल सेक्रेटरी शिवाजी सोनावणे, सेक्रेटरी कमरअली लातूरवाला, संजय सुर्वे, खजिनदार अनिल भुजबळ, कंपनीचे प्लांट डायरेक्टर संबीत प्रहराज, जनरल मॅनेजर राजेंद्र सेठीया, उपमहाव्यवस्थापक उत्पादन दीपक जाधव, मनीष सातपुते, प्रकाश लोखंडे, व्यवस्थापक मानवसंसाधन महेश वैद्य यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कामगार, अधिकारी व त्यांचे कुटुंबीय बहुसंख्येने उपस्थित होते.
सूत्र संचालन निलेश शिनलकर यांनी केले व आभार प्रदर्शन प्रशांत चौगुले यांनी केले. अमित कांबळे व दीपक गौड यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मदत केली.












