न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी:- पिंपरी-चिंचवड शहरातील मासूळकर कॉलनीत महापालिकेचे पहिले नेत्र रुग्णालय उभे राहत आहेत. या रुग्णालयात नागरिकांना उत्तम सेवा-सुविधा मिळणार असून नेत्र रुग्णालयामुळे शहरातील वायसीएम रुग्णालयावरील वाढता ताण कमी होणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील मासूळकर कॉलनीतील नेत्र रुग्णालयाची इमारत तीन मजली असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या रुग्णालयातील अंतर्गत काम सुरु असल्याने रुग्णालय लवकरच नागरिकांसाठी खुले केले जाणार आहे.
या रुग्णालयात शस्त्रक्रिया विभाग, बाह्यरुग्ण विभाग, नागरी आरोग्य केंद्र, तपासणी कक्ष, क्ष किरण तपासणी, निर्जंतुकीकरण विभाग, स्ट्रेसचेक, पंजीकरण कक्ष आदी सुविधा पुरविण्यात येणार आहेत. या रुग्णालयात उपचारासाठी 32 खाटा असणार आहेत. तसेच, रुग्णालयात एका विभागात प्रसुती कक्ष सुरु केला जाणार आहे.