न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड :- कोल्हापुर येथे पार पडलेल्या साऊथ झेान सीबीएसई अॅथलेटिक स्पर्धेत चिंचवड येथील पोदार स्कूल ची खेळाडू ख़ुशी उमेश हिने २ सुवर्ण पदाकाची कमाई करत पोदार शाळेच्या नावलौकिकात भर घातली. तिची तेलंगना येथे होणा-या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेत महाराष्ट्र व् गोवा येथून एकूण ६०० खेळांडूनी सहभाग नोंद्वला होता. स्पर्धेतील विजेती खेळाडू ख़ुशी उमेश हिने १४ वर्ष मुली मध्ये १०० मि. व २०० मि. धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून बेस्ट अॅथलेटिकचा किताब सुद्धा मिळवला.
विजेती खेळाडूचे प्राचार्य शहनाज कोटार, उपप्राचार्य अर्चना करंडे, मनीषा घोसरवडे यांनी अभिनंदन केले. या खेळाडूस क्रीडा शिक्षक प्रवीण दिघे, महेश कांबळे माधुरी राणे, आत्माराम काळे, सुप्रभात बांगर यांचे मार्गदर्शन लाभले.