न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. ५ नोव्हें.) :- चिंचवड पोलीस चौकीतील पोलीस अधिकारी तसेच सर्व कर्मचारी वर्ग यांना माननीय खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांना दिवाळी निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.
नगरसेविका अश्विनीताई चिंचवडे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी शुभेच्छा देताना खासदार श्रीरंग आप्पा बारणे म्हणाले की, “गणेशोत्सव, नवरात्र व इतर सर्व सण शांततेत साजरे व्हावेत यासाठी सणासुदीतही सुट्टी न घेता आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या पोलीसांप्रती कृतज्ञता म्हणून शुभेच्छा देणे गरजेचे आहे. याकरिता मी स्वतः व माझे शिवसेनेचे पदाधिकारी आपणास शुभेच्छा देण्यासाठी आलो आहोत. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी जशी पोलीस विभागाची आहे तशीच आमची देखील आहे. आम्ही देखील सार्वजनिक जीवनात काम करणारे कार्यकर्ते आपल्या सोबत आहोत अशी ग्वाही दिली. ”
याप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रभाकर शिंदे साहेब डॉ. दिलीप कामत, अनंत कोऱ्हाळे, बाळासाहेब वाल्हेकर, उमेश गोलांडे, विशाल गावडे ,सुर्यकांत भोसले, विनायक माने, दर्शना संगमे, पोलीस मित्र संघटनेचे सुभाष मालुसरे, मधुकर साठे आदी मान्यवर उपस्थित होते.










