न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (६ नोव्हें.) :- मोहननगर येथील महादेव मंदिर कार्यालयात पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या चिंचवड विभागाकडून दिवाळीनिमित्त कौटुंबिक स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी सर्व वृत्तपत्र विक्रेते व त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते.
मेळाव्याची सुरूवात मा. नगरसेवक नारायण बहिरवाडे, राजू गुणवंत, सदाशिव जंगम, वीरभद्र वाणी, भालचंद्र देशपांडे, विभागप्रमुख राजकुकार ढमाले, महावीर भराटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.
मयुरी काकडे साई नामदे, संस्कृती सस्ते, अदिती नामदे, अपूर्वा नामदे, विलास जंगम, कुणाल भराटे, अभिमान विटकर, महती कासट, वैष्णवी सुरवसे,यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे वृत्तपत्र विक्रेते व त्यांचे कुटुंबीय आनंदित झाले. १० वी १२ वी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या सिध्देश जंगम, रूचिता बेंडखळे, विद्या चौधरी, प्रथमेश नामदे या विद्यार्थ्यांना ५०००/- रूपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. तसेच महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते इरफान सय्यद यांनी रूचिता रमेश बेडंखळे हिला शैक्षणिक खर्चासाठी १०,०००/- रूपयांचा धनादेश दिला.
मृण्मयी शिदंकर, सायली गोरे, ईशा रोहोकले, गार्गी काकडे, ज्योती गुंड या खेळाडूंना क्रिडाक्षेत्रात विशेष प्राविण्य मिळाल्याबद्दल गौरवण्यात आले. तसेच वृत्तपत्र विक्रेते मनोज काकडे व रघुराज येरंडे यांना गड-किल्ल्यासंदर्भात विशेष कार्य केल्याबद्दल गौरवण्यात आले.
याप्रसंगी पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे, मा. नगरसेवक नारायण बहिरवाडे, कामगार नेते इरफान सय्यद, अरूण निवंगुणे, प्रवीण जाधव, नितीन पारेख, अतुल पारगे, सुहास जाधव, अभय नरवडे, परशुराम सईद यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी गणेश यादव, प्रकाश यादव, राहुल कोल्हटकर, पूणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे कार्याध्यक्ष दत्ता पिसे, उपाध्यक्ष अनंता भिकुले, प्रवीण माने, सुर्यकांत भोईर, देविदास शेळके, कृष्णाकांत कांबळी व विविध विभागातून आलेले वृत्तपत्र विक्रेते तसेच वितरण प्रतिनिधी विजय जाधव, सुनिल महापुरे, मराठे साहेब, संतोष जराड, किशोर अमराळे, मंगेश शिंदे, निलेश बरबटे, दिनेश देवकाते, संदीप बदाले, अभिजीत कुर्हाडे हे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल नामदे, सुर्यकांत शिंदकर, सुनिल सुरवसे, नितीन ठाकुर, बाळू गोरे, सुभाष डफळ, विठ्ठल सस्ते, गणेश जाधव व विभागातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिल दळवी यांनी केले तर सर्वांचे आभार विनय शेट्टी यांनी मानले.










