न्युज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. २७ नोव्हें) :- चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर चौकामध्ये मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यात धारातिर्थी झालेले पोलीस अधिकारी, सैनिक, शेकडो नागरीकांचा बळी गेला, तर काहीजण गंभीर जखमी झाले. यावेळी जिगरबाज सैनिकांनी जिवाची बाजी लावून अजमल कसाबसारखा खतरनाक अतिरेकी जिवंत पकडला होता.
यावेळी शहीद झालेल्या जवानांना चिंचवड येथे पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी चिंचवड येथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभाकर शिंदे, पोलीस फ्रेंडस् वेलफेअर असोसिएशन चे संस्थापक – अध्यक्ष गजानन चिंचवडे, उपमहापौर सचिन चिंचवडे, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, नगरसेवक राजेंद्र गावडे, सीएसएफ कमांडो ग्रूपचे जवान व अधिकारी यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.










