- थेरगावातील घटना; पोलिसांकडून आरोपींना बेड्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जून २०२१) :- भांडणाचा राग मनात धरून आरोपी गेल्या दोन-तीन दिवसांपासून तरुणाच्या शोधत होते. रविवारी रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास थेरगाव येथील सोळा नंबर बसस्टॉप येथे तो तरूण दिसला.
आरोपींनी त्याच्यावर केले. यामध्ये तरूण गंभीर जखमी झाला. त्यास उपचारासाठी खासगी रुग्णालयात दखल केले. मात्र उपचार सुरू असताना रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
धोत्रे (रा. थेरगाव) असे खून झालेल्या इसमाचे नाव असून त्याच्यावर देखील गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. वैभव गायकवाड, प्रथमेश शिंदे आणि मंथन चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी तातडीने आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली. वाकड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.