न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी : शिवसेनेच्या वतीने मासुळकर कॉलनीतील हनुमान मंदिरासमोरील दुर्गंधीयुक्त दुषीत पाण्याच्या साठ्याची त्वरित विल्हेवाट लावावी, याकरिता ‘क’ प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाचे प्रशासन अधिकारी आण्णा बोदडे यांना निवेदन देण्यात आले.
या समस्येबाबत प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी करूनसुद्धा प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. या प्रश्नाबाबत अधिकाऱ्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली व कोणतीही कारवाई केली नाही.
या परिसरात स्ट्रॉम वाटरचे दुर्गंधीयुक्त पाणी सोडले जाते. शेजारीच हनुमान मंदिर असून नागरिकांची दर्शनासाठी कायम वर्दळ असते. या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे त्यांच्या व परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
त्यामुळे प्रशासनाने या गंभीर समस्येची दखल घेऊन लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा आंदोलनाचा पवित्रा हाती घेऊ, असे शिवसेनेचे विभाग प्रमुख प्रदीप चव्हाण यांनी सांगितले.
निवेदन देताना शिवसेना समन्वयक दत्ता भालेराव, चंद्रकांत कणसे, कुणाल जगनाडे, गणेश जाधव, संभाजी मासुळकर, विपुल तेरे, अनिल कोकिरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.