न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२४) :- राज्यामध्ये वाढत चाललेली गुंडगिरी, दडपशाही, झुंडशाही तसेच दिवसा ढवळ्या होणारा गोळीबार याच्या विरोधामध्ये आपच्या शहराध्यक्ष मीनाताई जावळे यांच्या नेतृत्वामध्ये आक्रोश मोर्चा आज आकुर्डी विठ्ठल मंदिर ते अप्पर तहसील कार्यालय पर्यंत निगडी काढण्यात आला. तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
ह्यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष अमोल देवकाते, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष मीनाताई जावळे, पुणे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, उपाध्यक्ष अशोक लांडगे, उपाध्यक्ष संतोष इंगळे, सचिन पवार, वैजनाथ शिरसाठ, सरोज कदम (महिला अध्यक्ष) कमलेश रनवरे, स्मिता पवार, अजय सिंह, सुरेश भिसे, प्रशांत कोळवले, राहुल वाघमारे, ब्रह्मानंद जाधव, गोविंद माळी, अभिजीत सुर्यवंशी, सुरेंद्र कांबळे, कल्याणी चाकणे, स्वप्निल जेवळे, शुभम यादव, राज चाकणे, मिलिंद सरोदे, ॲड.गुणाजी मोरे, अमित मस्के, सय्यद अली, सुदर्शन जगदाळे, अक्षय शिंदे, सतीश यादव, किरण कांबळे, उमेश बागडे, अनिश वर्गीस, बालाजी कंठेकर, विक्रम गायकवाड, मयूर कांबळे, विजय लोखंडे, संजय कोने, शंकर थोरात, प्रशांत कांबळे, ॲड.अमित कांबळे, सुरेखाताई भोसले पुणे महिला अध्यक्ष , नौशाद अंसारी, धनंजय बनकर, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. हे उपस्थित होते.
यावेळी आपचे राज्य प्रदेश प्रवक्ते मुकुंद किर्दत, त्याचप्रमाणे आप प्रदेश सचिव सागर पाटील, आप प्रदेश पदवीधर आघाडी अध्यक्ष चेतन बेंद्रे, शहर अध्यक्ष मीनाताई जावळे, प्रवक्ते प्रकाश हागवणे आदी पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनाम्याची मागणी केली.