न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ फेब्रुवारी २०२४) :- ‘ब’ क्षेत्रिय कार्यालयातर्गत प्रभाग क्र. १६ रावेत येथील क्रिएटीव्ह अॅकेडमी निवासी शाळा इमारतीमधील पार्किंगची जागा व इतर संबंधित जागांमधील अनधिकृतपणे बांधलेल्या ०६ (२३७० स्क्वे. फुट) वर्ग खोल्या, ०२ (१२६० स्क्वे. फुट) ऑफिस रुम, ०१ (१८३० स्क्वे. फुट) कॅन्टीन, साठवणूक व इतर पार्किंगसाठी बनविण्यात आलेले ०४ (६०० स्क्वे. फुट) पत्राशेड तसेच इतर बांधकाम मिळून साधारण ६ हजार ६० स्क्वे. फुट बांधकामावर आज महापालिकेच्या वतीने निष्कासणाची कारवाई करण्यात आली.
कारवाई अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, उप आयुक्त मनोज लोणकर, क्षेत्रिय अधिकारी अमित पंडीत यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आली.
या कारवाईदरम्यान ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागातील कार्यकारी अभियंता आबासाहेब ढवळे, उपअभियंता दिनेश पाठक, कनिष्ठ अभियंता पंकज धेंडे, अमोल पवार, स्वप्नील गाडीवड्ड, बीट निरिक्षक तसेच रावेत पोलीस स्टेशनचे ०२ पोलीस, उपनिरीक्षक, ०५ कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे २४ कर्मचारी उपस्थित होते. कारवाई ०२ जेसीबी तसेच १० मजूर यांच्यामार्फत करण्यात आली.











