न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ फेब्रुवारी २०२४) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्प तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. येत्या मंगळवारी सकाळी अकरा वाजता दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृह, पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य प्रशासकीय भवन येथे हा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. संगणक प्रणालीद्वारे ई-बजेट तयार करण्यात आले आहे.
महापालिकेचा हा ४२ वा अर्थसंकल्प आहे. महापालिकेत १३ मार्च २०२२ पासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे २०२३-२४ चा अर्थसंकल्प आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनीच सादर केला होता. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या नेतृत्वात दुस-यांदा अर्थसंकल्प सादर होणार आहे. तसेच प्रशासकीय राजवटीमधील दुसरा अर्थसंकल्प असणार आहे.











