- शरदचंद्र पवार हे नाव निवडणुकांपर्यंत कायम ठेवण्याचे निर्देश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
नवी दिल्ली (दि. १९ फेब्रुवारी २०२४) :- राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबतची आजची सुनावणी सुप्रीम कोर्टात पार पडली. आजच्या सुनावणीत शरद पवार गटाची बाजू ऐकल्यानंतर सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला दोन आठवड्यात उत्तर देण्याची मुदत दिली आहे. तसेच निवडणुकांपर्यंत राष्ट्रवादी- शरदचंद्र पवार हे नाव कायम ठेऊन एका आठवड्यात नवे चिन्ह देण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा निकाल अजित पवारांच्या बाजूने दिल्यानंतर शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात पार पडली. आजच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह तसेच शरद पवार गटाच्या नव्या चिन्हाबाबत महत्वाचे निर्देश दिले आहेत.
सर्वप्रथम, शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी शरद पवार गटाला मिळालेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हेच नाव कायम ठेवण्याची विनंती केली. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने तयारी करण्याची असल्याने हेच नाव द्यावे, असे मनु सिंघवी म्हणाले. या मागणीनुसार शरद पवार गटाने चिन्ह मागितल्यावर एका आठवड्याच्या आत चिन्ह द्यावे असे निर्देश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्याचबरोबर निवडणुक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत दिलेल्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अजित पवार गटाला दोन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता तीन आठवड्यांनी हो


















