न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रुवारी २०२४) :- राज्याच्या 2024-25 वर्षाच्या एकूण (Budget Session) खर्चासाठी 6 लाख 522 कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज (मंगळवारी, दि. 27) विधानसभेत सादर केला. अर्थसंकल्पामध्ये 4 लाख 98 हजार 758 कोटी रुपये महसुली जमा आणि 5 लाख 8 हजार 492 कोटी रुपये महसुली खर्च दाखवण्यात आला आहे. महसुली तूट 9 हजार 734 कोटी रुपयांची तर, राजकोषीय तूट 99 हजार 288 कोटी रुपयांची अंदाजित करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात चार महिन्यांचे लेखानुदान मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे. मातंग समाजासाठी “आण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) ची स्थापनेचाही यात समावेश आहे, राज्याच्या पुढील भवितव्याचा मोठा विचार करून मांडलेला हा उत्तम अर्थ संकल्प असल्याचे मत भाजपचे पिंपरी विधानसभा निवडणुक प्रमुख अमित गोरखे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
यामध्ये मागासवर्गीय,महिला,तरुण यांचा व्यवसाय,शिक्षण या सर्वांचा सखोल विचार या अर्थ संकल्प मध्ये केलेला दिसतो. ग्रामसडक, रेल्वे मार्ग, बंदरे,विमानतळ भूसंपादने,परिवहन,उद्योग, या सर्व गोष्टींचा समन्वय या अर्थ संकल्प मध्ये दिसतो. जुन्नर येथे छ शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत संग्रहालय असेल किंवा युवक ,महिला,गरीब व अन्नदात या चार घटकांसाठी कल्याणकारी योजना असेल,शेतकऱ्यांचा विचार करून बांबु लागवडी साठी चां ही विचार या अर्थ संकल्पात केला आहे.
राज्याची खरी गरज ओळ खून अंगणवाड्या ना सौर ऊर्जा व १लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जा देण्याचा धाडसी निर्णय या बजेट मध्ये दिसतो. नमो शेतकरी महा सन्मान योजना ,5 इंडस्ट्रियल पार्क, शिधापत्रिका द्वारे प्रत्येकाला 1 साडी वाटपातून वस्त्राउद्योगला प्रेरणा दिली आहे, पुण्याच्या रिंग रोड साठी मोठा निधी या बजेट मध्ये ठेवलेला दिसतो. संगमवाडी, पुणे येथे लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारकासाठी निधी, असे उत्तम व सर्वसमावेशक बजेट आज मांडण्यात आले.











