न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रुवारी २०२४) :- पिंपरी- चिंचवडच्या पोलिस आयुक्तालयात अचानक दुसऱ्यांदा अभिनेते अमीर खान आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. अमीर खान पोलिस आयुक्तालयात आल्याने चर्चेल उधाण आले होते. मात्र, त्यांची ही पूर्वनियोजित भेट असल्याचं पुढं आलं.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांची भेट घेतली. अभिनेता आमिर खान आणि पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे हे मित्र असून आमिर खान खास मित्राला भेटण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये आला. यावेळी पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अमीर खान याच्यासोबत फोटो घेतला.











