न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रुवारी २०२४) :- नाशिक फाटा उड्डाणपूल ते कोकणे चौक या मार्गालगतच्या दुसऱ्या बाजूच्या अनधिकृत पत्राशेड व बांधकामावर कारवाई करण्यात आली. गुरुवारी साई चौक, जगताप डेअरी ते डांगे चौक या रस्त्यालगत कारवाई करण्यात येणार आहे.
सुमारे ४५ हजार चौफूट क्षेत्राचे पत्राशेड पाडण्यात आले. ही कारवाई आयुक्त शेखर सिंह यांचे आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील व शहर अभियंता मकरंद निकम यांचे नियोजनानुसार करण्यात आली.
सदरची कारवाई अ, ब,ग, ड क्षेत्रिय कार्यालयाकडील चार टीम मार्फत करणेत आली. उप आयुक्त मनोज लोणकर, क्षेत्रिय अधिकारी अंकुश जाधव, अमित पंडित, अजिंक्य येळे,सुचिता पानसरे, ४ उपअभियंता ५ कनिष्ठ अभियंता, ४ बीट निरीक्षक अतिक्रमण विभागाकडील एक पोलिस अधिकारी, ५ पोलिस, ३ महिला पोलिस ८० एम एस एफ जवान वाकड पोलीस स्टेशन कडील एक पोलिस अधिकारी व पोलीस, महिला पोलीस ४ जे सी बी,१ कटर व २० मजूर उपस्थित होते.