न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ मार्च २०२४) :- चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड कॉम्प्युटर स्टडीजच्या वतीने भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिके विजेते चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून पुणे जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्तरावर विज्ञान 2024 अंतर्गत पोस्टर बनविणे, वादविवाद, मॉडेल मेकींग, रांगोळी (गुगल ते गुरुकुल) खाद्यपदार्थ, स्टार्टअप (नवीन कल्पना) प्रकल्प सादरीकरण, नशामुक्त अभियान, पर्यावरण जागरुकता, (ई-कचरा संकलन) या विषयावर स्पर्धाचे आयोजन कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दिपक शहा यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यात 619 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवित उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत युवा वर्ग व्यसनाधीन होत चालला आहे, त्यासंदर्भात व्यसनाचे दुष्परिणाम, चंद्रयान मोहिम, पाण्याचा उपव्यय टाळा, पाणी वाचवा आदी सामाजिक व पर्यावरण विषयाला अनुसरून विविध प्रकारच्या प्रकल्पाचे सादरीकरण स्पर्धकांनी केले.
विज्ञान 2024 स्पर्धाचे सकाळच्या सत्रात उद्घाटन प्राचार्य डॉ.ए.के. वाळुंज यांच्या हस्ते करण्यात आले. दिवसभरात झालेल्या स्पर्धाचे पारितोषीक वितरण समारंभ दुपारच्या सत्रात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भूगोल विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ.रविंद्र जायभाये, प्राचार्य डॉ.ए.के. वाळुंज, मुख्य प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, उपप्राचार्या डॉ.क्षितीजा गांधी, समन्वयिका डॉ.जयश्री मुळे यांच्या हस्ते 42 विजेते स्पर्धकांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्रके बहाल करण्यात आली.
पारितोषिक वितरण समारंभात डॉ. रविंद्र जायभाये सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले, विज्ञान 2024 च्या स्पर्धेला पुणे जिल्ह्यातील स्पर्धकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. प्रतिभा महाविद्यालयाने राष्ट्रीय विज्ञान दिनांचे औचित्य साधून महाविद्यालयीन स्तरावर स्पर्धा घेवून विद्यार्थ्यांमधील स्पुप्त कलागुणांना वाव देत त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन रूजविण्याचा प्रयत्न करून त्यांना व्यासपीठ निर्माण केले. ही कौतुकास्पद व अभिनंदनास पात्र अशीच कृती संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी केली आहे. विज्ञानाचा प्रचार व प्रसारासाठी अशा व्यासपीठांची आज गरज आहे. गुणवंत विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धात सहभाग नोंदवित भविष्यात राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान स्पधेर्र्त सहभाग नोंदवित समाजात आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण करतील. अशा स्पर्धांमधूनच विद्यार्थ्यांच्या अंगीभूत कलागुणाचा विकास होतो. त्यांनी सामाजिक, आर्थिक, पर्यावरण आदी प्रश्नांकडे एकांकी न पाहता विज्ञान जिज्ञासेतून परिश्रम, निरीक्षण करून नाविण्याची कास अंगिकारात भविष्यात अभ्यासपूर्ण प्रकल्पाचे सादरीकरण करून नवीन तंत्रज्ञान निर्मीतीचा ध्यास अंगिकारावा.
डॉ. राजेंद्र कांकरीया म्हणाले, या शिक्षण संस्थांचे संस्थापक डॉ. दिपक शहा विद्यार्थ्यांना नेहमीच नाविण्यपूर्ण उपक्रमे व हुशार गरजू विद्यार्थ्यांना सर्वप्रकारचे सहाय्य करतात. त्यांना प्रेरणा, उर्जा मिळावी. यासाठी प्रयत्नशिल असतात. आज विविध स्पर्धात स्पर्धकांनी उत्कृष्ठ विविध प्रकल्पाचे सादरीकरण केले. ही कौतुकास्पद बाब आहे. पाहणी करताना एखाद्याची कमतरता जाणवली तर, त्यांना वेळीच योग्य सूचना दिल्या तर नक्कीच त्यांच्यात बदल घडू शकतो. विज्ञान हे जिज्ञासातून विकसित होते. तर तंत्रज्ञान गरजेतून त्यासाठी प्रश्न विचारून, वाद घालून, तपासणी, प्रयोग करून विज्ञानरूपी पाया घट्ट करण्याची आवश्यकता आहे. परंतु, आजही समाजात बुवाबाजी, चमत्कार, अंधश्रद्धेत समाज गुरफुटला असल्याचे चित्र दिसून येते. हे चित्र युवापिढीने बदलण्याची आवश्यकता असून आज विज्ञानाची सृष्टी घेतली. पण दृष्टी हव्या त्याप्रमाणात घेतली नाही, अशी खंतही यावेळी बोलून दाखविली.
प्रास्ताविकात प्राचार्य डॉ.ए.के.वाळुंज म्हणाले, संस्थाचालक व प्राध्यापकांचे सहकार्य यांच्या मार्गदर्शन व सहकार्यामुळेच विज्ञान 2024 हा आगळा वेगळा उपक्रम स्पर्धा जिल्हास्तरीय स्वरूपात घेण्यात आल्या. विद्यार्थी व समाजात जागरुकता व वैज्ञानिक वृत्ती वाढावी. यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली. नोबेल पारितोषिक विजेते चंद्रशेखर वेंकट रमण यांना नोबेल पुरस्कार कसा मिळाला, यासंदर्भात सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.
समारंभाच्या प्रसंगी उपस्थितांचे स्वागत डॉ. हर्षिता वाच्छानी यांनी तर, प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. जयश्री मुळे यांनी केले. विजेत्या स्पर्धकांच्या यादीचे वाचन डॉ. श्रृती गणपुले व प्रा. हेमलता चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रोहित आकोलकर यांनी तर, आभार उपप्राचार्या डॉ.क्षितीजा गांधी यांनी मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विविध विभागातील डॉ. रुपा शहा, डॉ. अनामिका घोष, डॉ. जयश्री ननावरे, प्रा. सुवर्णा गोगटे, प्रा. दिपाली महाजन, प्रा. हनुमंत कोळी समवेत प्राध्यापक वर्ग व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी विशेष परीश्रम घेतले.