न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ मार्च २०२४) :- आधारकार्ड प्रमाणेच मतदान ओळखपत्र हा एक आवश्यक दस्तऐवज आहे. मतदान ओळखपत्र बनवायचे असेल तर घरबसल्या देखील बनवू शकता. कुठेही जाण्याची गरज नाही, मतदान ओळखपत्र बनवून मिळेपर्यंत साधारण महिनाभराचा कालावधी जाऊ शकतो. मतदार ओळखपत्रावरील ब्लॅक अँड व्हाईट फोटो बदलून त्याऐवजी रुबाबदार रंगीत फोटो असलेले ओळखपत्र यापुढे देण्यात येणार आहे.
बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदारांना ओळखपत्रे दिली आहेत. पण मतदार ओळखपत्र तयार करताना ब्लॅक अँड व्हाईट फोटोचा दर्जा अतिशय खराब असल्याने मतदारांची ओळख पटवण्यातही अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर रंगीत फोटो असलेले स्मार्ट कार्ड दर्जाचे नवीन रंगीत ओळखपत्र तयार करण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने गेले वर्षभर हाती घेतला आहे. ज्या मतदारांनी मतदार ओळखपत्रात सुधारणा करण्यासाठी अर्ज केले होते त्यांना रंगीत ओळखपत्र देण्यात आले आहे. तसेच १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांनाही रंगीत मतदार ओळखपत्र देण्यात आले आहे. त्यासाठी बीएलओ घरोघरी जाऊन मतदारांकडून रंगीत फोटो जमा करणार आहेत. नवीन ओळखपत्रावरील फोटो ओळखणे सोपे होणार आहे. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने मतदान करणाऱ्यांना आळा बसणार आहे.
ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज…
भारतीय नागरिक ज्याचे वय कमीत कमी १८ वर्षे आहे तो मतदान ओळखपत्र बनवू शकतो. यामध्ये तुमचा कायमचा पत्ता दिलेला असतो. मतदान ओळखपत्र बनवण्याकरिता ऑनलाइन किवा ऑफलाइन अर्ज करू शकता.
महिनाभरात मिळेल मतदान ओळखपत्र..
ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमच्या मेल आयडीवर विभागाकडून एक लिंक पाठवली जाईल. ज्या माध्यमातून तुम्ही वोटर आयडीचे स्टेटस तपासू शकता. साधारण महिनाभराच्या कालावधीमध्ये तुमचे मतदान ओळखपत्र तुमच्या घरी पोहोचेल.
निवडणूक आयोगाच्यावतीने मतदार नोंदणीचे काम निरंतरपणे सुरू आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने कामकाज सुरू आहे. तसेच नोंदणी केलेल्या नवीन मतदारांना नवीन ओळखपत्रही दिले जात आहे. त्यातून मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
– नीलेश देशमुख, निवडणूक निर्णय अधिकारी…











