न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२४) :- सेक्टर १२ मधील पीएमआरडीए प्रकल्पांतर्गत बी-३ हरिश्चंद्र गड सोसायटी यांच्या वतीने दि. ०९ मार्च २०२४ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा उद्देश महिलांचा आदर सन्मान स्त्री शक्ती ला वंदन करणे तसचे हरिश्चंद्रगड हे नवीन कुटुंब एकत्रित यावे आपल्यातील आत्मीयता प्रेम वाढून सर्वामध्ये सुंदर नात निर्माण व्हावं हा उद्देश सफल करण्याच्या हेतून या कार्यक्राचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरवात बाल कलाकार यांनी सादर केलेल्या गणेश वंदनेने करण्यात आली.यामध्ये शांभवी रणपिसे , ओवी कांबळे , प्रणवि माळी , अनन्या वंगवाड , अवनी वगंवाड या मुलींचा समावेश होता. तदनंतर महिलांना आरोग्या बाबत मार्गदर्शन करणारे चर्चा सत्र डॉ.जयश्री बोरुळकर यांनी केले. महिलांसाठीखास स्त्री व्यक्तीमत्वाचे दर्शन घडविणारे विशेष नृत्याचे सादरीकरण करण्यात आले.
मिलिंद रणपिसे यांनी पारंपारिक कथक नृत्यसादर करुन रसीकांची वाहवा मिळवली. तसेच निवेदक मानस साठे यांनी रुखीमाई या गीतावर कथक नृत्य सादर करुन प्रेक्षकांची मने जिंकली. यानंतर सर्व महिलांचा फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. यामध्ये महिलांनी स्त्री जीवनातील विविध पात्रांचा समावेश करुन कार्यक्रमात रंग भरला. सौ श्रदधा पामे यांनी महिलांसाठी मनोरंजक खेळांचे आयोजन केले होते. विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करण्या-या महिलांचा सत्कार मान्यवरांच्या हातून करण्यात आला. यामध्ये सोनाली हिरवे , संगीता रणपिसे , गौराबाई हिंगमिरे , सुरेखा म्हापदी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सोसायटीचे चेअरमन श्री तुषार साबणे यांनी सर्वांचे आभार मानले.
तसेच तुषार साबणे , तुषार भोसले , मिलिंद रणपिसे, गणेश हूंबे, निलेश चव्हाण, विकास कांबळे, वैभव/शुभम पामे, पियूष खंडारे,कैलास राक्षे, अनिरुद्ध वांगवड. योगेश कुसलकर, प्रदीप माळी, यांनी सक्रिय सहभाग देऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मदत केली. कार्यक्रमाचे निवेदन मानस साठे यांनी केले.


















