न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मार्च २०२४) :- पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलातील सहायक पोलिस आयुक्तांची विविध विभागांत नेमणूक करण्यासह इतर विभागांचा अतिरिक्त कार्यभारही सोपविण्यात आला आहे. तसेच एका सहाय्यक पोलिस आयुक्तांची बदली केली आहे. याबाबतचे आदेश पोलिस उपायुक्त माधुरी कांगणे-केदार यांनी दिले आहेत.
गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश माने यांची विशेष शाखेत बदली केली आहे. तसेच वाकड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्याकडे गुन्हे शाखेचाही अतिरिक्त कार्यभार दिला आहे.
यासह नव्याने पिंपरी-चिंचवड पोलिस दलात दाखल झालेले सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन हिरे यांच्याकडे पिंपरी विभागाची जबाबदारी दिली असून त्यांच्याकडेच भोसरी एमआयडीसी विभागाचाही अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे.











