न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मार्च २०२४) :- त्रिवेणीनगर येथील स्टार फ्लॉवर डेकोरेटर या मंडप डेकोरेशन साहित्य पुरवणाऱ्या शॉपला व त्याच्या शेजारी असलेल्या एका गॅरेजला गुरुवारी दुपारी ३:३५ वाजता आग लागली. आगीत कार्पेट, कपडा , फर्निचर, डेकोरेशन साहित्य लोखंडे अँगल, या सर्व मंडप डेकोरेशन साठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याला आग लागून मोठे नुकसान झाले आहे.
घटनास्थळी आग लागल्याची वर्दी प्राप्त होताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या तळवडे, चिखली, प्राधिकरण, पिंपरी, भोसरी, मोशी, व थेरगाव, अग्निशमन केंद्रांना घटनास्थळी त्वरित रवाना करण्यात आले. ही आग एकूण १० अग्निशमन वाहनाच्या मदतीने विझविण्यात आली.
सुदैवाने सदरच्या आगीमध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही, आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन दलाचे एकूण ५८ कर्मचारी/अधिकारी वर्गाने आगीवर नियंत्रण मिळविले आहे.











