- यशवंत भोसले यांनी थेट भाजपकडून मागितली मावळची उमेदवारी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मार्च २०२४) :- राज्यातील संघटीत व असंघटित श्रमिकांच्या हितासाठी संघटनेच्या माध्यमातून गेली २९ वर्ष मी अविरत काम करत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी चिंचवड, तळेगाव, लोणावळा, पनवेल, कर्जत, उरण, मावळ, तळेगाव शहरांमध्ये औद्योगिकीकरण विस्तारले आहे.
लाखोंच्या संख्येने कामगार वर्ग आपल्या परिवारासह या ठिकाणी स्थिरावलेला आहे. श्रमिकांचा प्रतिनिधि म्हणून देशात उत्तम संदेश जावा यासाठी भाजप पार्टीचा कार्यकर्ता म्हणून कामाचा अनुभव लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीची मावळ लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मला द्यावी, अशी मागणी कामगार नेते यशवंत भोसले यांनी पक्षश्रेष्ठींकडे पत्रकार परिषदेत केली आहे.
आम्हाला उमेदवारी दिल्यास आम्ही शंभर टक्के विजयी होऊ असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.














