न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२४) :- आळंदी येथील इंद्रायणी नदीकाठी, भागेश्वरी धर्मशाळा ट्रस्टच्या जमीनमधील मोकळ्या जागेत पिंपळाच्या झाडाच्या पुर्वेस (दि २०) रोजी सकाळी ०७:५५ च्या सुमारास अंदाजे ३५ ते ४५ वयाच्या अनोळखी महीलेच्या डोक्यात दगड मारुन खुन केला होता. पोलीसांनी गुन्हा रजि नं १९१/२०२४ भादवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला.
संशयीत आरोपीचे रेखाचित्र काढुन घेवुन ते रेखाचित्र प्रसारीत केले. यातील संशयीत इसम ज्ञानेश्वर गजानन इंगोले (वय ३१ वर्ष धंदा मजुरी रा. इंद्रायणी घाट आळंदी देवाची) याला दुचाकीसह ताब्यात घेवुन त्याच्याकडे सखोल चौकशी केली. त्याने गुन्हयाची कबुल दिली. त्याच्याकडे मिळुन आलेली दुचाकीदेखील चोरीची होती. शिक्रापुर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण येथे गुन्हा दाखल असलयाचे निष्पन्न झाले आहे. त्याच्या अंगावरील कपडे रक्ताने माखलेले दिसुन आले.
त्याने प्रेमभंगातुन महीलेचे दुस-या इसमाबरोबर संबंध असल्याच्या संशयावरुन महीलेच्या डोक्यात मारुन तीचा खुन केल्याचे त्याने सांगीतले. त्यानंतर तपासी अंमलदार यांनी आरोपीस दि २०/४/२०२४ रोजी २३/१० वा अटक करणात आलेली असुन अटक आरोपीची दि २५/४/२०२४ रोजी पर्यत ५ दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळाल्याने गुन्हयाचा तसेच मृत अनोळखी महिलेची ओळख पटविण्याचे दृष्टीने अधिक तपास दिघी पोलीस स्टेशनचे विजय ढमाळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे तपास करीत.