न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ मे २०२४) :- मोशी, बोऱ्हाडेवाडी, वडमुखवाडी, चोविसावाडी, शिवाजीवाडी, डूडूळगाव, चिखली, मोशी, इंद्रायणीनगर, प्राधिकरण, स्पाइन रोड,चक्रपाणी वसाहत, सद्गुरू नगर परिसरात काही दिवस पाणी पुरवठा अनियमित, कमी वेळ आणि कमी दाबाने विस्कळीत राहणार आहे.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून निघोजे पंपिंग स्टेशन येथे इंद्रायणी नदीची पातळी कमी असल्याने पंपिंग बंद करावे लागत आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने चिखली जलशुद्धीकरण केंद्र येथे पाणी उपसा होऊ शकत नाही.
तसेच एमआयडीसीची जलवाहिनी गळती झाल्याने शनिवारी पाणी पुरवठा मनापास होऊ शकलेला नाही. त्यामुळे पाण्याची अनियमितता समजून नागरिकांनी पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.